बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai Chaudhary poems

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai Chaudhary poems

धरीत्रीच्या कुशीमधीं बीयबियानं निजलीं
वऱ्ह पसरली माती जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं अंगावरतीं शहारे

ऊन वाऱ्याशी खेयतां एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार झाली शेतामधी दाटी
कसे वा-‍यानं डोलती दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी देव अजब गारोडी !

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai Chaudhary poems

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai Chaudhary poems

अरे संसार संसार

अरे संसार संसार
जसा तावा चुल्यावर
आधी हाताले चटके
तवा मियते भाकर

करा संसार संसार
खोटा कधीं म्हणूं नहीं
राउळाच्या कयसाले
लोटा कधीं म्हणूं नहीं

अरे संसार संसार
नही रडनं कुढनं
येडया, गयांतला हार
म्हणूं नको रे लोढणं

अरे संसार संसार
खीरा येलावरचा तोड
एक तोंडा मधी कडू
बाकी अवघा लागे गोड

अरे संसार संसार
म्हणू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल
मढी गोंडंब्याचा ठेवा

देशा संसार संसार
शेंग वरतण कांटे
अरे, वरतून कांटे
मधीं चिक्ने सागरगोटे

ऐका संसार संसार
दोन्ही जीवाचा इचार
देतो दुःखाले होकार
अन सुखाले नकार

देखा संसार संसार
दोन्ही जीवाचा सुधार
कधी नगद उधार
सुखादुखाचा बेपार

अरे संसार संसार
असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर
त्याच्या वरती मदार

असा संसार संसार
आधी देवाचा ईसार
माझ्या दैवाचा जोजार
मंग जीवाचा आधार !

उगवले नारायण by बहिणाबाई चौधरी

उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात || १||
उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर || २||

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस || ३||

वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी || ४||

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी || ५||

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत || ६||

वाटच्या वाटसरा

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी
नशीबी दगड गोटे
काट्या कुट्याचा धनी
पायाले लागे ठेचा
आलं डोयाले पानी

वरून तापे उन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फ़ोड आले रे पायी

जानच पडीन रे
तुले लोकाच्यासाठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट

उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखात
रमव तुझा जीव
धीर धर मनात

उघडू नको आता
तुझ्या झाकल्या मुठी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

माझेज भाऊबंद
घाईसनी येतीन !’
नको धरू रे आशा
धर एव्हढं ध्यान

तुझ्या पायाने जानं
तुझा तुलेच जीव
लावनी पार आता
तुझी तुलेच नाव

मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यात झुकीसनी
चुकू नको रे वाट

दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हाती
सोडू नको रे धीर
येवो संकट किती

येऊ दे परचिती
काय तुझ्या ललाटी
वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी

बहिणाबाई चौधरी यांच्या कविता –मन

मन वढाय वढाय
उभ्या पिकांतलं ढोर
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा
जश्या वाऱ्यानं चालल्या
पान्या वरल्यारे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोण?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं ते तंतर
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !

मन पांखरूं पांखरूं
त्याची काय सांगूं मात
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभायान्त

मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं
त्यांत आभाया मायेना

देवा, कास देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !

देवा, आसं कसं रे मन
आसं कसं रे घडलं?
कुठे जागेपणी तुले
आसं सपन पडलं !

कशाला काय म्हणूं नही ? by बहिणाबाई चौधरी

बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं

नही वार्‍यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं

पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं

निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं

ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं

येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं

नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं

अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं

दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं

इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं

ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं.

Related searches :

  • बहिणाबाई चौधरी यांच्या कविता
  • बहिणाबाई चौधरी यांच्या कविता संग्रह
  • बहिणाबाई चौधरी यांच्या कविता संग्रह pdf
  • बहिणाबाई चौधरी यांच्या कविता संग्रह करा
  • बहिणाबाई चौधरी यांच्या कविता मराठी
  • बहिणाबाई चौधरी यांच्या कविता भाषा
  • bahinabai chaudhary poems
  • bahinabai chaudhari poems
  • bahinabai poems
  • bahinabai chaudhari poems pdf
  • bahinabai chaudhari ahirani kavita
  • bahinabai chaudhari all kavita
  • bahinabai chaudhari kavita book pdf
  • bahinabai chaudhari kavita book
  • bahinabai chaudhari chi kavita
  • bahinabai chaudhari chya kavita
  • bahinabai poems in marathi
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता | Bahinabai Chaudhary poems

Leave a Comment