सुंदर मराठी बोधकथा – योग्य तात्पर्या सहित | Marathi Bodh Katha | बोध कथा मराठी

1/5 - (2 votes)

सुंदर मराठी बोधकथा – योग्य तात्पर्या सहित | Marathi Bodh Katha | बोध कथा मराठी

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मराठी मधून सुंदर बोधकथा बोधकथा वाचल्यामुळे आपल्या जीवनात खूप सारे बदल घडून येऊ शकता आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी या बोधकथांच्याद्वारे शिकण्यासाठी मिळत असतात याचसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सुंदर मराठी बोधकथा त्याचबरोबर योग्य तात्पर्य सहित म्हणजे आपल्याला बोधकथा वाचल्यानंतर काय समजले हे आम्ही थोडक्यात तात्पर्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहेत आपण या सर्व बोधकथा बारकाईने वाचाल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आजच्या या मराठी बोधकथा या लेखाला सुरुवात करतो.

सुंदर मराठी बोधकथा - योग्य तात्पर्या सहित | Marathi Bodh Katha | बोध कथा मराठी

marathi bodh katha-आत्‍मज्ञान

  एक संत वनात कुटी बांधून राहत होते. कंदमुळे खाऊन ते गुजराण करत असत आणि परमेश्‍वराचे चिंतन करत. वनातून जाणारा कोणी त्‍यांची कुटी पाहून थांबत असे. तेव्‍हा ते त्‍याच्‍याशी प्रेमाने बोलत. जे काही जवळ असेल ते त्‍याला खाऊ घालत. एक दिवस एक तरूण त्‍यांना भेटायला आला.

त्‍यांच्‍या बोलण्‍याने तो प्रभावित झाला आणि त्‍यांचा शिष्‍य बनून तेथेच राहू लागला. संताने त्‍याला तपश्‍चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली. शिष्‍याने गुरुच्‍या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरु केली. गुरुशिष्‍य स्‍नेहभावनेने राहू लागले. एकदा संत त्‍याला म्‍हणाले. मन मोठे चंचल असते, त्‍याला नियंत्रणातच ठेवले पाहिजे.

ही गोष्‍ट शिष्‍याच्‍या मनावर ठसली. त्‍या दिवसापासून त्‍याने स्‍वत:ला एका खोलीत बंद करून घेतले. संताने त्‍याला विचारले असता शिष्‍य म्‍हणाला की, तो त्‍याच्‍या मनावर ताबा मिळविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. शिष्‍य रात्रंदिवस खोलीतच राहू लागला. आश्रमात येणा-या जाणा-याकडे तो अजिबात लक्ष देईनासा झाला. एकेदिवशी गुरुने शिष्‍याला खोलीचा दरवाजा उघडावयास सांगितले. 

गुरु आत आले ते हातात एक वीट घेऊनच. गुरुंनी शिष्‍याला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली. शिष्‍याने विचारले की, गुरुजी हे काय करताय तुम्‍ही. गुरु म्‍हणाले, या विटेपासून आरसा बनवायचा आहे. शिष्‍य म्‍हणाला, गुरुजी असे कसे शक्‍य आहे. गुरुजी शांतपणे शिष्‍याला म्‍हणाले.

ज्‍याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसे मनाचा आरसा बनू शकत नाही. मन तर धूळ आहे जी आत्‍म्‍यावर पडलेली असते. धूळ विसरण्‍याचा प्रयत्‍न केला तरच खरेपणा दिसून येतो. शिष्‍याला गुरुची शिकवण समजून आली.

मराठी बोधकथा तात्पर्य – चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते.

साधू आणि गवळण – बोध कथा मराठी

एका गावात एक साधू राहत होता लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे. त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे. एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला.

साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले. आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला.” साधू हसत म्हणाला”लोक तर ईश्वराच्या नावावर संसारसागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. असे वाटते कि तुला ईश्वरावर विश्वास नाही. त्या भोळ्या गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली. साधू त्यावेळी अजून झोपलेले होते. तिच्या हाकेने साधू जा गा झा ला.

दार उघडताच तिला पाहून साधू हैराण झाला. त्याने विचारले,”रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा काय आलात?” गवळण म्हणाली,”महाराज! तुमच्या उपदेशाने माझे काम झाले, नावेची समस्या कायमची संपली. रोजचे भाडे वाचले, आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून आले” साधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. जेंव्हा ती नदीच्या रस्त्याने जाऊ लागली, तेंव्हा साधूही तिच्यापाठोपाठ नदीत गेला.

जेंव्हा पाण्याची पातळी वाढली तेंव्हा साधू घाबरून पाण्यात पडला आणि वाचविण्यासाठी आवाज देवू लागला, तेंव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले,” तुम्ही आपला च उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता.” गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून शरमिंदा झाला.

सवय | मराठी बोधकथा


एका माणसाने त्याूच्याा घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्याे पोपटाला चांगले खायलाप्याययला मिळत असे व पोपट बोलका असल्यालने घरातील लोकांकडून त्यातचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्यास मनात मात्र पारतंत्र्याचे शल्यल दाटून येई.

अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्यार माणसाने पोपटाला खाणे देण्याईसाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्या च्या.हातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याघने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्यात बाहेर निघून गेला.

पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याेने त्यांला फारसे नीट उडताच येत नव्हनते. एका झाडावर गेला असता त्याेला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्या ने त्याइला पोपटांची भाषा येत नव्हरती म्ह णून इतर पोपटही त्या.ला सहकारी मानत नव्ह ते.

पिंज-यात आयते खायची सवय असल्यााने त्या ला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याअने तो आजारी पडला व मरून गेला.

तात्पपर्य: जास्तल काळ पारतंत्र्यात [ गुलामगिरीत ] राहिल्यााने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृरतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वापतंत्र्य टिकवण्याहसाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्याग संस्कृटतीचे चांगले काही घेताना आपल्याम संस्कृयतीचे विस्म रण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.

उपदेश – Marathi Bodh Katha


एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत एका गावात आले. त्‍या गावातील मुख्‍य व्‍यक्ती बुद्धांना पसंत करत नसे. जेव्‍हा त्‍याला माहिती झाले की, बुद्ध आपल्‍या शिष्‍यांसोबत गावात येत आहे तेव्‍हा त्‍याने गावातील लोकांना आदेश दिला की, आपल्‍या घराची दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका. बुद्ध त्‍या व्‍यक्तिच्‍या स्‍वभावाला ओळखून होते.

मार्गात जेव्‍हा त्‍याचे घर आले तेव्‍हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले. बुद्धांचा आवाज ऐकून तो मुख्‍य व्यक्ती नाराज झाला आणि म्‍हणू लागला,’’ तुम्‍ही येथून निघून जा, कामधंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता. कष्‍टाचे काम करायला शिका आणि पोट भरा.’’ बुद्ध गुपचुप त्‍याचे अपमानास्‍पद बोलणे ऐकत होते. त्‍याचे बोलणे संपल्‍यावर बुद्ध म्‍हणाले.

माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा. आपल्‍या घरी येऊन जर काही खाण्‍यासाठी मागत असेल, आपण ताट सजवून आणले मात्र त्‍यानंतरही तो ते न स्‍वीकारताच निघून गेला तर तुम्‍ही त्‍या खाद्यपदार्थाचे काय कराल?’’ ती व्‍यक्ती म्‍हणाली,’’ मी ते नष्‍ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन’’ तेव्‍हा बुद्ध म्‍हणाले.

त्‍या दशेनुसार आपले सामान आपल्‍याजवळच राहिले ना? त्‍याचप्रमाणे आपल्‍या घरी येऊन आम्‍ही भिक्षा मागितली आणि बदल्‍यात आपण आम्‍हाला अपशब्‍द वापरले. भिक्षेत दिलेले हे शब्‍द आम्‍ही अस्‍वीकार केले. त्‍यामुळे ते तुमच्‍याजवळच राहिले.’’ मुख्‍य व्‍यक्तीला आपली चूक उमगून आली. बुद्धांची त्‍याने क्षमा मागितली. तो त्‍यांचा शिष्‍य बनला.

तात्‍पर्य– उग्रपणाने वागल्‍यास होणा-या कामात अडथळा निर्माण होतो आणि संयमाने वागल्‍यास न होणारे कामसुद्धा पटकन होऊन जाते.

मराठी मधून बोधकथा.

विद्यार्थी मित्रांनो आपण वरती काही मराठी मधून बोधकथा वाचल्या आपल्याला या बोधकथा कशा वाटल्या आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे आपल्याला या बोधकथेमधून तात्पर्य आपल्या मनातून काय आले या बोधकथा मधून आपल्याला काय शिकण्यासारखं मिळालं हे देखील आपण कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील यापासून मदत होईल त्याचप्रमाणे आपण हा लेख आपल्या मित्रांना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील मराठी मधून बोधकथा शोधण्यास मदत होईल आणि त्याच प्रमाणे त्यांना देखील चांगले विचार मिळण्यास मदत होईल धन्यवाद.

Leave a Comment