निबंध लेखन मराठी | Marathi Nibandh Lekhan

5/5 - (18 votes)


निबंध लेखन मराठी | Marathi Nibandh Lekhan

निबंध लेखन मराठी : निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे निबंध म्हणजे बांधणे म्हणजे विचाराला धरून बांधणे बंधन या अर्थाने वापरला जातो. निबंध मध्ये साधक बादक चर्चा असते निबंध हा स्वतंत्र मराठीतील साहित्य प्रकार आहे निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असलेला.


निबंध लेखन करताना पुढील भाषिक कौशल्य आपल्यात असणे गरजेचे असते.
1] श्रवण
2] संभाषण
3] वाचन
4] लेखन
5] निरीक्षण
6] शब्दसंपत्ती विकास
7] सराव

निबंध म्हणजे काय ?

निबंध लेखन म्हणजे आपल्या मनातील भावना त्यामध्ये लिहून काढणे एखादी कथा एखादा प्रसंग महान व्यक्तींबद्दल माहिती हे सगळे आपण ज्यामध्ये लिहितो त्याला निबंध लेखन असे म्हणतात.

निबंध लेखन मराठी | Marathi Nibandh Lekhan

निबंध लेखन मराठी | Marathi Nibandh Lekhan

निबंधाचे प्रकार | निबंध लेखन मराठी

मराठी निबंधाचे पुढील प्रमाणे प्रकार आहे:
1) आत्मकथनात्मक निबंध
2) कथनात्मक निबंध
3) कल्पनाप्रधान निबंध
4) प्रसंगावर निबंध
5) वैचारिक निबंध
आपण सर्व प्रकारांचे सविस्तर माहिती पाहूया….

आत्मकथनात्मक निबंध मराठी | Atmakatha Nibandh In Marathi


1] आत्मकथनात्मक निबंध


आत्मकथनात्मक एखादी सजीव वस्तू किंवा निर्जीव वस्तू आपल्या जीवनाचे कथन करीत आहे सांगत आहे अशी कल्पना करून हा निबंध असा इथे लिहावा लागतो.. निबंधामध्ये एखादी व्यक्ती स्वतः बोलत आहे असे दर्शवले जाते त्यामधून त्या बोलणाऱ्या वस्तू किंवा व्यक्तीचा भावना ह्या निबंध मधून व्यक्त केल्या जाता.
उदाहरणार्थ : मी शाळा बोलत आहे.
त्याने मत म्हणून शाळा तिची भावना व्यक्त करीत ती त्याने बंदा मधून असे दर्शववेल कातली शोधा बोलू राहील त्यातील मनातील भावना कोणापाशी तरी व्यक्त करू राहिली. आत्महतूक निबंधामध्ये एखाद्या विषयाचे आत्मचरित्र लिहावे लागते म्हणजे तो सुद्धा बोलत आहे.

कथनात्मक निबंध मराठी | कथानात्मक निबंध


2] कथनात्मक निबंध


कथनात्मक निबंध हा घडून घेतलेल्या घटनेवर असतो. एखादी घटना घडून गेली व ती निबंध मध्ये लिहिणे याला कथनात्मक निबंध म्हणतात. आपल्या आयुष्यातील एखादा आनंदाचा क्षण किंवा कोणती घटना असेल ती लिहिणे किंवा आठवणे म्हणजे कथनात्मक निबंध
उदाहरणार्थ : माझा शाळेतील पहिला दिवस.
त्यामध्ये मग शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण घटना किंवा एखाद्या क्षण त्यामध्ये येतो.
पहिल्या दिवशी भेटलेले मित्र मैत्रीण नवीन शिक्षक नवीन शाळा याविषयी निबंध मध्ये ती कथा लिहावी लागते. कथनात्मक निबंध मध्ये आपण सर्व काही लिहू शकतो घडून गेलेल्या गोष्टी एखाद्या मित्रासंग घातलेला वेळ आनंदाचा क्षण त्या दिवसाची आठवण येऊ शकतो एखाद्या सणाच्या दिवशीची आठवण तुमची सणाच्या दिवशी केलेल्या प्रत्येक गोष्टीची आठवण ही कथा असते ही कथा आता आठवण लिहिणे म्हणजेच कथनात्मक निबंध.

कल्पनाप्रधान निबंध मराठी | Kalpanapradhan Nibandh


3] कल्पनाप्रधान निबंध


अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली तर काय होईल अशी कल्पना करून हा निबंध येथे लिहायचा असतो कल्पनाप्रधान निबंध मध्ये तुम्ही जशी कल्पना कराल तसा निबंध लिहीत पुढे हळूहळू लिहित राहायचा असतो
कल्पनात्मक निबंध म्हणजे भविष्यकाळातील घटनांची कल्पना करणे किंवा स्वप्न बघणे याला कल्पनात्मक निबंध म्हणतात.. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचं असेल त्याचा विचार करणे याला देखील आपण कल्पनात्मक म्हणू शकतो हे युग हे खूप धावतीयुग आहे.


उदाहरणार्थ : यंत्र युगातील मानव किंवा रोबोट.
रोबोट ही यांत्रिक अभियांत्रिकी आहे ती बनवणे त्याचा अभ्यास करणे व आयुष्यात असे काही रोबोट तयार करणे याचा विचार करणे किंवा एखाद्याला आयुष्यात खूप काही करायचं असेल त्या गोष्टीचा विचार करणे म्हणजे कल्पना करणे याला कल्पनात्मक निबंध असे आपण म्हणू शकतो.


आपल्याला शाळेमध्ये कल्पनात्मक निबंध असा निबंध येतो त्यावर आपल्याला निबंध लिहायचा असतो. दिलेल्या विषयावर सविस्तर निबंध लिहिणे जी भविष्यकाळातील घटना आहे ती आत्ता सत्य उतरवणे म्हणजे कल्पनात्मक… ..
आपल्याला कल्पनात्मक निबंध म्हणजे नेमके काय असते हे माहीत नसते पण आपण हे आपल्या आयुष्यात रोज अनुभवत असतो उदाहरणार्थ आपण विचार करतो की मला आयुष्यात खूप मोठे यश मिळवायचे आहे त्याचा विचार करणे ही देखील कल्पनात्मक आहे यालाच कल्पनात्मक म्हणू शकतो

प्रसंगावर निबंध मराठी | Prasang lekhan Nibhand Marathi

4] प्रसंगावर निबंध | निबंध लेखन मराठी


आपण अनुभवलेल्या व पाहिलेल्या गोष्टीचे दृश्याची जशीच्या तशी शब्दांमध्ये वर्णन करणं म्हणजेच प्रसंगावर निबंध होय किंवा वर्णनात्मक निबंध होय . आपल्या दैनंदिन जीवनात खूप काही प्रसंग होत असतात खूप काही घटना घडत असतात यालाच आपण प्रसंगावर निबंध असे म्हणू शकतो. एखाद्या प्रसंगावर विचार करणे व ते आपल्या भाषेत निबंध स्वरूपात लिहिणे हे प्रसंगावर निबंध असे आहे.


आपण रोज कुठे ना कुठे जात असतो त्या ठिकाणी आपल्या संघ अशी एखादी तरी गोळ गोष्ट घडते ती आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते त्या प्रसंगावर आपले मत व्यक्त करणे आपण लिहिणे यालाच प्रसंग निबंध म्हणू शकतो.


उदाहरणार्थ मी पाहिलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा त्या पुतळ्याची देखरेख तेथील वातावरण तेथील त्या मूर्तीची बांधकाम त्या मूर्तीचे तेज हे आपला एक आयुष्यातील प्रसंग आहे अशा एखाद्या प्रसंगावर आपल्याला निबंध लेखन करण्यासाठी येतो. अजून पण आपण खूप उदाहरण देऊ शकतो. असा कोणीच नसतो का त्याच्या आयुष्यात प्रसंग घडलेला नसेल प्रसंग हा आपल्या मानवी जीवनात घडलेला असतो त्या प्रसंगावर आठवून लिहिणे यालाच प्रसंगावर निबंध असे म्हणतात.

वैचारिक लेखन निबंध मराठी | Vaicharik Nibandh Lekhan


5] वैचारिक निबंध | निबंध लेखन मराठी


वैचारिक निबंधामध्ये विचाराला महत्व चिंतनाचा महत्व असते विचाराची दोन्ही बाजू मांडून आपली बाजू कशी बरोबर आहे हे उदाहरण देऊन आपले मत व्यक्त करावे लागते वैचारिक निबंध हा विचारांना प्रभावित करणारा विषय आहे हा विषय आपल्याला तर्क वितर्क लढायला लावतो समाजामध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत त्याचे निराकरण कसे करावे ज्या काही चांगल्या गोष्टी वस्तू आहेत ते आपल्याला या निबंधातून मांडावे लागतात पहिलं तर ते खोडून काढावे लागतं व खंडन करावे लागत हे जे खंडनमंडन आहे हे आपल्याला वैचारिक निबंध मधून मांडावे लागते समजा आपण एखादं उदाहरण घेतलं मोबाईल शाप की वरदान यावर आपलं मत व्यक्त करावे लागत यालाच वैचारिक निबंध असे म्हणतात.

समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला खंडन मंडन करावे लागते दुसऱ्याने मांडलेल्या गोष्टीवर अभ्यास करून त्या गोष्टीवर आपल्या विचार मांडणं या वैचारिक निबंध मध्ये येते आपल्या दैनंदिन जीवनातील घटनाही या विषयांमध्ये येतात जे काही विचार करणारे गोष्ट आहे हे सारे वैचारिक निबंधामध्ये येतात विचार चालना देणारी भावनेपेक्षा विचारांना जास्त महत्त्व आहे तर्क वितरकांना महत्त्व आहे अनुकूल आणि प्रतिकूल मत मांडणे या ठिकाणी महत्त्वाचं असतं आणि साहजिकच आपलं मन मांडताना निष्कर्षापर्यंत यायचं की जे मत जे मत सगळ्यांना आवडेल किंबहुना त्यांना पटेल असे मांडणी करणं महत्त्वाचं असतं या ठिकाणी आपला सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला मांडायचा आहे पुढचा कसा वाईट आणि आपण कशी चांगली हे दाखवण्यासाठी भरपूर उदाहरणे द्यावे लागतात.
उदाहरणार्थ पर्यावरणा पुढील आव्हाने, मोबाईल शाप की वरदान, वाढती महागाई.

जगातील महान व्यक्ती | महान व्यक्ती

महान व्यक्ती
आपल्या भारत देशामध्ये खूप महान व्यक्ती होऊन गेले त्यांची आत्मचरित्र त्यांची वागणूक त्यांनी केलेल्या पराक्रमांचा माहिती लिहिणे यामध्ये येते. भारत देशामध्ये महात्मा गांधी महात्मा फुले सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज यांसारखे महान व्यक्ती होऊन गेली त्यांची आत्मचरित्र खूप मोठे मोठे आहे ते आपण माहीत करून घेतले पाहिजे हे आपल्याला निबंध स्वरूपामध्ये लिहावे लागते.


यामध्ये समजा महात्मा गांधींनी काय केली कशाचा सत्याग्रह केला त्यांचा जन्म त्यांनी केलेले कार्य व त्यांचे निधनापर्यंत जे काही प्रसंग घडला असेल त्या व्यक्तीबद्दल ही सर्व काही यामध्ये लिहिले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथे शाळा कधी चालू केली त्यांचा जन्मदिवस का म्हणून ओळखला जातो त्यांनी केलेल्या त्यागासाठी त्यांनी मुलींना शिकवलेली पहिली शाळा कुठे चालू केली हे सर्व काही यामध्ये लिहिले पाहिजे त्यांच्या पतीचे नाव त्यांच्या पतींनी त्यांना शिकवले काय हे सर्व यामध्ये लिहिले पाहिजे. ती व्यक्ती कशी आहे त्या व्यक्तीचे हुबेहूब व्यक्ती चित्रण शब्दात करणे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे विचार कशी आहे त्या व्यक्तीचं वर्तन कसा आहे त्या व्यक्तीचे महान कार्य कसे आहे त्या व्यक्तीचं येथे संदर्भत वर्णन करणे.

Related searches :

  • निबंध लेखन विषय
  • निबंध लेखन मराठी 10वी
  • निबंध लेखन मराठी 9वी
  • निबंध लेखन मराठी
  • वैचारिक निबंध लेखन मराठी
  • निबंध प्रसंग लेखन मराठी 10वी
  • निबंध लेखन class 10 marathi
  • सारांश लेखन मराठी निबंध 10वी
  • कथा लेखन मराठी निबंध 10वी
  • प्रसंग लेखन मराठी 10वी निबंध
  • 12 वी मराठी निबंध लेखन
  • marathi nibandh
  • marathi nibandh book
  • marathi nibandh class 10
  • marathi nibandh class 8

Leave a Comment