माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi

5/5 - (21 votes)

माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh

माझी शाळा मराठी निबंध : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण आजच्या या लेखामध्ये माझी शाळा मराठी निबंध लेखन करणारा हा लेख जरा पण माझी शाळा निबंध याविषयी देखील बघत असाल तर मी आपल्याला खात्री करून देतो की आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज या लेखांमध्ये नक्की देऊ कारण आम्ही देखील या लेखामध्ये या प्रश्नाची उत्तर घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो आम्ही खाली तुमच्यासाठी निबंधाचे काही नमुने दिलेले आहे त्या नमुने तुम्ही बारकाईने वाचावे आणि त्यानंतर त्याखाली हमी हा निबंध लिहीत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून आपल्याला हा निबंध मन आणि देखील लिहिता येईल याचे देखील थोडक्यात वर्णन केलेले आहेत ते देखील तुम्ही वाचू शकता चला तर पाहूया आजच्या या नवीन निबंधाला माझी शाळा मराठी निबंध.

माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi

निबंध 1

माझी शाळा मराठी निबंध – My School Essay In Marathi

मी विद्यानिकेतन मध्ये शिकत आहे. माझी शाळा ही मराठी माध्यमाची शाळा आहे मला माझी शाळा खूप आवडते माझ्या शाळेत अगदी बालवाडीपासून तर बारावीपर्यंत सर्व वर्गांची शिक्षण घेतले जाऊ शकते. माझ्या शाळेला खूप चांगले असेल शिक्षक देखील लाभलेली आहे या शिक्षकांना कारणाने आमच्या शाळेचा निकाल वर्षानुवर्षे चांगलं लागत आहे आणि शिक्षक हे सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवतात त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिकवलेले सर्व गोष्टी समजतात.

शाळेला तीन वेगवेगळ्या इमारती आहे आमची शाळेत एक मोठे वाचनालय देखील आपल्याला पाहायला मिळेल शाळेत प्रयोगशाळा क्रीडांगण संगणक हॉल नाटक गृह हे सर्व गोष्टी पाहायला मिळतील त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे मैदान देखील खूप मोठी मैदान आहेत तीन वेगवेगळ्या इमारतींची मिळून एकच मैदान आमच्या शाळेला आहे.

या मैदानावर शाळेतील सर्व मुले मनसोक्तपणे खेळतात त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये खेळण्यासाठी सर्व साहित्य देखील उपलब्ध आहे शाळेमध्ये ग्रंथालय असल्याकारणाने मुलांना आवडती चे पुस्तके अगदी सहज रित्या आमची शाळा आम्हाला देते आणि शाळेमध्ये संगणक कक्ष असल्याकारणाने सर्व विद्यार्थ्यांना संगणकाचे देखील शिक्षण दिले जाते

शाळेतील खूप सारे विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून खूप चांगले बक्षीस मिळवतात आणि या सर्व गोष्टींचे श्रेय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जाते त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये इंग्रजी बोलण्याची वेगळे वर्ग घेतले जातात त्यामध्ये आम्हाला सर्वांना इंग्रजी कसे बोलायचे हे शिकवतात या सर्व कारणांमुळे मला माझी शाळा खूप आवडते.

मराठी निबंध 2

माझी शाळा यावर निबंध | Mazi shala yavar nibandh

माझ्या शाळेचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे हे नावच आमच्या शाळेला वेगळी शाळा म्हणून देखील पाहण्यास भाग पाडले. कारण आमच्या शाळेला नावाप्रमाणे आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी देखील खूप गुणी आणि हुशार आहे आमच्या शाळेत खूप चांगली शिक्षक आणि त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी देखील खूप चांगले आहे आमच्या शाळेमध्ये शिस्त ही गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते आणि सर्व विद्यार्थ्यांना खूप शिस्तबद्ध रहावे लागते.

आमच्या शाळेला दोन इमारती आणि एक मैदान आहेत त्याचप्रमाणे शाळेमध्ये संगणक कक्ष ग्रंथालय प्रयोगशाळा पाण्याची टाकी आणि बाथरूमची सुविधादेखील उपलब्ध आहे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक की शाळेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात आणि त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त प्रमाणात अभ्यास आणि अभ्यासासोबत खेळायला देखील प्रोत्साहन करत असतात.

शाळेतील विद्यार्थी हे परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून बक्षीस जिंकत असतात तसेच काही विद्यार्थी हे खेळांमध्ये पुढे जाऊन देखील बक्षीस जिंकून शाळेचे नाव पुढे नेत असतात. शाळेमध्ये सर्व शिक्षक खूप चांगल्या प्रकारे शिकवतात त्यामुळे शाळेचा इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल हा खूप चांगला लागतो आणि खूप सार्‍या विद्यार्थ्यांना खूप चांगले असे गुण मिळवून ते या शाळेतून खूप साऱ्या चांगल्या आठवणी घेऊन पुढे जात असतात.

या सर्व कारणांमुळे मला माझी शाळा खूप आवडते.

मराठी निबंध 3

My School Essay in Marathi | Mazi Shala Marathi Nibandh

माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय लोणी आहे. माझी शाळा ही लोणी गावाच्या मध्यभागी आहे शाळेच्या कळाला गावाचा सप्ताह इ बाजार भरत असतो त्याचप्रमाणे गावभर आतील सर्व नागरिकांचे खूप चांगल्या प्रकारे आमच्या शाळेवर सहकार्य लाभलेले आहे.

माझ्या शाळेला तीन इमारती आहे त्याच प्रमाणे 150 हून अधिक खोल्या आमच्या शाळेला लाभलेल्या आहे आमच्या शाळेमध्ये दोन मैदाने ,पाच प्रयोग शाळा, दोन संगणक कक्ष, टेक्निकल विभागासाठी प्रयोग शाळा, क्रीडा खोली, शिक्षकांसाठी तीन स्टाफ रूम आहेत. शाळेमध्ये एक ग्रंथालय देखील उपलब्ध करून देण्यात आल्या त्याच प्रमाणे आमच्या शाळेला कार्यक्रम करण्यासाठी 2 स्टेज देखील आहे . विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी दोन पाण्याच्या टाक्या त्याच प्रमाणे आमच्या शाळेत फिल्टरची देखील व्यवस्था केलेली आहे.

माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गमे सर आहे हे आमच्या शाळेचे खूप चांगले असे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. गमे सरांमुळे आमची शाळा ही इतकी भव्य आणि मोठी बनलेली आहे की आसपासच्या गावांमधून देखील आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी येतात आणि त्यांच्या पालकांनीदेखील आमच्या या शाळेवर विश्वास ठेवून त्यांचे मुलं आमच्या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतात या सर्वांची श्रेय आमचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जाते.

आमच्या शाळेमध्ये गुरुकुल, सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम असे तीन विभाग पडलेली आहेत त्याचप्रमाणे आपण इयत्ता नववी नंतर टेक्निकल विभागात देखील आपले शिक्षण करू शकता या सर्व सुविधा आणि आमचे सर्व चांगली शिक्षक या सर्व क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे त्याच प्रमाणे शाळेमध्ये दोन हजाराहून जास्त विद्यार्थी शिकत आहे आणि या सर्व विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून पेपर मध्ये देखील चांगला निकाल लावण्याचा प्रयत्न करतात.

इयत्ता दहावी आणि बारावी या वर्गाचा निकाल 95% च्या पुढेच आमच्या शाळेत लागत असतो कारण आमच्या शाळेतील खूप चांगले अशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मेहनत या दोन्ही गोष्टींमुळे शाळेचा निकाल खूप चांगला लागतो. शाळेमध्ये प्रत्येक विषयाला 5 पेक्षा जास्त शिक्षक उपलब्ध आहेत आणि शाळेतील सर्व शिक्षकांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे.

इयत्ता नववी आणि दहावी त्याचप्रमाणे इयत्ता अकरावी आणि बारावी या वर्गांसाठी आमची शाळा खूप बारकाईने लक्ष देऊन विद्यार्थ्यांकडून खूप मेहनत करून घेत असते त्याचप्रमाणे आमच्या शाळेतील क्रीडा विभागातील शिक्षक देखील खेळांमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि बक्षीस जिंकून आणण्याचा देखील प्रयत्न करत असतात शाळेत दर वर्षी 200 पेक्षा जास्त बक्षीस जिंकून आणण्याचे रेकॉर्ड आमची शाळा बनवत असते. माझी शाळा ही खूप मोठी शाळा आहे या शाळेत मी शिकत आहे याचे मला खूप अभिमान वाटतो आणि मला या शाळेत खूप चांगले शिक्षक आणि मुख्याध्यापक देखील चांगले मिळाले याचा आम्हाला कायम अभिमान वाटेल म्हणून मला ही माझी शाळा खूप आवडते.

माझी शाळा निबंध लिहीत असताना घ्यायची काळजी

विद्यार्थी मित्रांनो माझी शाळा मराठी निबंध हा आपण आपल्या मनाने देखील लिहू शकता माझी शाळा मराठी निबंध लिहीत असताना आपण काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला हा निबंध चांगल्या पद्धतीने लिहित येईल .

 1. माझी शाळा निबंध लिहीत असताना आपण प्रथमता शाळेचे नाव लिहिलेले पाहिजे.
 2. शाळेमध्ये कोण कोणत्या गोष्टी आहे या सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे लिहिल्या पाहिजेत.
 3. शाळेचे मुख्याध्यापक यांचे नाव आणि त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक कसे आहे याचे सविस्तर वर्णन केले पाहिजे.
 4. शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात आणि विद्यार्थी कसे आहेत याचे देखील वर्णन आपण केले पाहिजे.
 5. शाळेमध्ये नवीन कोणत्या गोष्टी केल्या जातात काय आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या देखील लिहिल्या पाहिजे.
 6. इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल आपल्या शाळेचा किती लागतो आणि शाळे मधील विद्यार्थी बक्षीस किती जमतात याचा देखील उल्लेख आपल्या निबंधात असला पाहिजे.
 7. शेवटी मला माझी शाळा खूप आवडते असे लिहून आपण या निबंध चा शेवट करू शकता.

वरती दिलेल्या गोष्टींचा वापर करून आपण माझी शाळा हा निबंध मनाने देखील देऊ शकता आणि उत्तम गुण देखील मिळू शकता.

माझी शाळा निबंध मराठी – Majhi Shala Nibandh in Marathi

विद्यार्थी मित्रांनो वरती आम्ही तुम्हाला माझी शाळा मराठी निबंध याचे तीन अतिशय उत्कृष्ट नमुने दिलेली आहे त्याच पद्धतीने त्या उदाहरणांचा खाली आम्ही मनाने माझी शाळा मराठी निबंध कसा लिहायचा याचेदेखील वर्णन केलेले आहे हे सर्व आपण वाचलेच असेल आपल्याला अजून कोणत्या माहितीची गरज असेल ते देखील तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता तुम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारण्यासाठी कमेंट बॉक्स चा वापर करू शकता .

आम्ही तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत राहू त्याचप्रमाणे विद्यार्थीमित्रांनो आपल्याला या लेखात कोणती गोष्ट आवडली आणि देखील आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांचे देखील नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील निबंध लिहीत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि निबंध कसा लिहायचा या गोष्टी देखील त्यांना समजतील.

आपण हा लेख पूर्ण वाचला याबद्दल निर्मळ अकॅडमी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आज या ठिकाणी थांबते. धन्यवाद

Related searches

 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी
 • माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी
 • माझी शाळा निबंध विकिपीडिया
 • माझी शाळा माझी जबाबदारी मराठी निबंध
 • माझी शाळा निबंध मराठी इयत्ता आठवी
 • माझी शाळा स्वच्छ शाळा निबंध
 • शाळा विषयी निबंध
 • Majhi Shala Nibandh in Marathi

Leave a Comment