Top 10 – Marathi Kavita | मराठी कविता | Marathi poem

5/5 - (42 votes)

Marathi kavita : आजच्या या नवीन लेखांमध्ये Nirmal Academy आपल्या सर्वांचे प्रथमता स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आजचा हा लेखामध्ये आपण मराठी कविता बघणार आहोत.

याची मी आपल्या सर्वांना आत्ताच खात्री करून देतो जेणेकरून आपल्याला मराठी कविता वाचण्यामध्ये आणि मराठी कवितांचे कलेक्शन करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही चला तर सुरुवात करूया आजच्या या लेखाला या लेखाची टायटल आपण मराठी कविता असे टाकलेले आहेत टायटल नुसार आपण आजच्या या लेखांमध्ये पाहूया मराठी कविता ( marathi kavita ) .

Marathi Kavita | मराठी कविता |  Marathi poem
Marathi Kavita | मराठी कविता | Marathi poem

मराठी ही भाषा आपल्या महाराष्ट्रातील मातृभाषा म्हणून ओळखली जाते आणि आपल्या काही थोर कवींनी खूप चांगल्या अशा कविता आपल्यासाठी प्रस्तुत केलेल्या आहेत त्या कविता आपल्या मराठी भाषेत आहे याचे मला अभिमान वाटतो आणि अशाच या मराठी कवितांनी आपल्या मराठी मातृभाषेला एक नवीनच दृष्टिकोन देखील दिलेला आहेत अशाच या नवीन नवीन मराठी कवितांचा संग्रह आपण आजच्या या लेखांमध्ये केलेला आहेत.

कारण मराठी ही भाषा आणि मराठी कविता या भाषेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून देखील आपण याला पाहतो आणि याच मराठी भाषेंना आपण आमच्या या लेखांमधून वाचत आहात याचे आम्हाला अभिमान वाटते त्याचप्रमाणे आपण मराठी कविता गुगल वर सर्च करून आपल्या या वेबसाईटवर आला याचा अर्थ एकच आपल्याला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी आणि मराठी कवितांची उदाहरणे किंवा मराठी कविता बघण्यास रुची आहे मग आम्ही आपल्या या मौल्यवान वेळेला चांगल्या प्रकारे आमच्या या लेखावर व्यतित करण्यास आपल्यास मदत करू.

 

क्षण मराठी कविता | Marathi Kavita

Marathi Kavita | मराठी कविता |  Marathi poem

 

क्षण क्षण बदले
दाखवी रंग स्वःताचा
क्षण क्षण साचे
मनांमध्ये विचारांचे आचार
क्षण क्षण सरला पुढे
नेऊन ठेवले शेवटी
क्षण क्षण सरतो
काय ठेवतो शेवटी ?
क्षण क्षण गेला वाया
आता विचार करती क्षणा-क्षणाला
आभाळ सरतयं वरती
क्षण क्षण हे तीक्ष्ण
न नजरेला कळती
क्षणाक्षणाला रहावे सजग
असा अट्टाहास करती

 

अशा माणसांना जपावे | Marathi Kavita

Marathi Kavita | मराठी कविता |  Marathi poem

 

जाणीव ज्यांना आपली भेटीस उत्सुक असावे…!
डोळ्यात ज्यांच्या आदर अशा माणसांना जपावे…!

आवड ज्यांना आपली अशांसोबत सदा रमाव…!
सुख दुःख वाटानी घेती अशा माणसांना जपावे….

आनंदी चेहरा पाहण्यास नेहमी नेहमी तथा भेटावे….!
हे मन जिथे हलके होते अशा माणसांना जपावे….

 

सोबत मराठी कविता | Marathi Kavita

एकटया सुईचा स्वभाव
टोचणारा असतो.

परंतु धागा सोबतीला आला
की हाच स्वभाव बदलून
एक दुसऱ्यांना जोडणारा दुवा बनते….

म्हणून एकटेपणा नको
तर चांगली सोबत हवी…
त्यासाठी आपला योग्य धागा निवडा..!

तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं……
उनाड मोकळं,
एक रान वाटतं…..

सदैव मनात जपलेलं,
पिंपळपान वाटतं…..
कधी बेधुंद,
कधी बेभान वाटतं….

Marathi Kavita

वाचणं हे पेरणं असतं
तर लिहिणं म्हणजे उगवणं,
उगवण्याची चिंता करीत
बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा,
एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य
लोक पेरणीसाठी घेऊन जातील.
–व्यकंटेश कल्याणकर

वाचणं हे पेरणं असतं
तर लिहिणं म्हणजे उगवणं,
उगवण्याची चिंता करीत
बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा,
एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य
लोक पेरणीसाठी घेऊन जातील.
–व्यकंटेश कल्याणकर

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो…
आणि रिकामा खिसा जगातील ‘माणसं’ दाखवतो.
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं,
त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
‘विचित्र आहे पण सत्य आहे’
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले तर…!!
जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…!!
चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात.
फरक इतकाच की, औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही…
-पु. ल. देशपांडे

अत्यंत महागडी,
न परवडणारी खऱ्या अर्थाने
ज्याची हानी भरून येत नाही
अशी गोष्ट किती उरली आहे
याचा हिशोब नसताना आपण जी
वारेमाप उधळतो ती म्हणजे
‘आयुष्य’
–व. पू. काळे

ज्याची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत,
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे
आपले श्रींमत ह्रदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे,
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे.
–दत्ता हलसगीकर

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भितींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
– कुसुमाग्रज

मन मनास उमगत नाही,
आधार कसा शोधावा स्वप्नातील पदर धुक्याचा,
हातात कसा लागावा
मन थेंबाचे आकाश, लाटांनी सावरलेलं
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेलं
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा
मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
चेहरा-मोहरा याचा, कुणी कधी पाहिला नाही
मन अस्तित्त्वाचा सिंधू, भासाविण दुसरा नाही
या ओळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
– सुधीर मोघे

असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची…
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळाली सत्तर,
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुनी देताना…
संकटासही ठणकावुनी सांगावे, आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना…
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर-कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर…
–विंदा करंदीकर

आयुष्यात मला भावलेले एक गुज मी तुम्हाला सांगतो,
उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका.
साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री, तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल
पु. ल. देशपांडे

विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा…
माझ्या दुःखी, व्यथित मनाचं तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही,
दुःखावर मला जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा…
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही,
माझं बळ मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा…
माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावंस अशी माझी अपेक्षा नाही,
माझं मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा…
माझं तारण तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही,
तरूण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा…
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस करी माझी तक्रार नाही,
ते ओझं वहाण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा…
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच
मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा
तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा…
-रविंद्रनाथ टागोर

marathi kavita on life | heart touching marathi kavita on life

आपल्याला मराठी कविता आवडल्या का आपल्याला अजून कोणत्या प्रकारच्या मराठी कवितेन विषयी माहिती हवी होती किंवा आपल्याला कोणत्या मराठी कविता अभ्यासायच्या होत्या याविषयी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता आम्ही तुमच्यासाठी त्या कविता नक्की घेऊन येऊया त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या लेखामध्ये अजून कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तरी देखील आपण आम्हाला कमेंट्स सहाय्याने सांगू शकता आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू या.

मराठी कविता ह्या आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत हे मला माहित आहे आणि त्याच प्रमाणे राठी भाषेमध्ये खूप सार्‍या मराठी कवितांचा संग्रह देखील केलेला आहेत एवढा मोठा संग्रह आपण एकाच या लेखामध्ये पाहू शकत नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी फक्त चार कविता घेऊन आलेलो आहोत आणि त्याच प्रमाणे आपल्याला अजून कोणत्याही कवितेची सविस्तर वर्णन हवे देखील आम्ही तुमच्यासाठी ते वर्णन घेऊन या.

आपण हा लेख आपल्या सर्व मित्र परिवारांशी नक्की शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील मराठी कवितेंविषयी थोडक्यात वर्णन आणि चार मराठी कविता अभ्यासायला मिळतील त्याचप्रमाणे त्यांना देखील या लेखाचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि आम्हाला देखील फायदा होईल

Related searches

Leave a Comment